काहि वाचण्यासारखे

एकदा गावच्या डोंगरावर भटकतांना मला एका भल्यामोठ्या दगडावर एक झाडं उगवलेलं दिसलं, जवळ जाऊन बघतो तर गंमतच होती. अगदी जराशीच माती त्या दगडावर, कुठूनतरी येऊन ते बिजं त्यात रुजल असावं. मी विचार केला या झाडाचं आयुष्य किती? पण एकाएकी तरारुन आलेल्या त्या हस- या झाडाचं हिरवेपण बघून अगदीच रोमांचीत झालो. कदाचीत ते झाड म्हणत असावं दगडाशी झुंजून थकेस्तोवर तरी भरभरायचं नंतर भलेही सुकून जाऊ.. रुजण्यापूरती माती आहे, हवा आणि ओल आहे मग कशाची वाट बघायची? चला रुजुयातं... खरतरं पानगळ कष्टप्रदच. अश्या पानगळीच्या काळात सोबतीची पाखरंही उडून जातात, ज्याची त्यानेच सोसायची असते भयाण पानगळं. एखादा सामान्य माणूस किंवा नावाजलेल व्यक्तिमत्व प्रत्येकालाच पानगळीतून जावं लागतंच. पण तश्या विदीर्णावस्थेत स्वतःला टिकवुन ठेवणं उद्याच्या बहराची वाट पाहत त्या असह्य झळा सोसत जाणं. जिकीरीचच कामं. पण तश्या एकाकीपणात कुठूनतरी चार दवाचे थेंब मिळतात अन् नवपालवीच स्वप्न अजून गर्द होत जातं.. पूर्वी ढ कॅटॅगिरीत मोडल्या गेलेला आणि आता मात्र स्वतःच्या गावची अख्खी बाजारपेठ काबिज करणारा माझा एक चिक्कार यशस्वी मित्र.. मध्यंतरी त्याला भेटायचा योग आला त्याचे शब्द अजून रुंजी घालतात. "आयला काहिच नव्हत रे हातात हिंमतीशीवायं...!! आज तो ऐन बहरात आहे पण त्यानेही पानगळ सोसलीच ना? शेवटी ज्याच्यात कळा आणि झळा सोसायची धम्मकं आहे त्याच हिरवेपण कुणीच हिरावू शकतं नाही.. नाही का ?

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट