यशवंतराव चव्हान विकास प्रशासन प्रबोधिनी

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ही महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेद्वारे शासकीय अधिकारी आणि ग्रामीण, नागरी अधिकारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाते. मनुष्य बळ विकास हे महाराष्ट्राचे परंपरागत शक्तिस्थान आहे. सुदृढ व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेचे महत्व १९६३ मध्ये मुंबईत प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या ( ASC) स्थापनेबरोबर जाणवले. १९९४ मध्ये ASC चे पुण्यात स्थलांतर झाले व तिचे "महाराष्ट्र प्रशासन विकास संस्था" असे नामकरण करण्यात आले आहे. MIDA ची सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा, १८६० खाली "स्वयंचलित संस्था" म्हणून नोदंणी करण्यात आली. प्रशासन विकासाच्या नविन क्षेत्रात विकास घडवून आणणा-या शिखर संस्थेचे स्वरूप देण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान श्री.यशवंतराव चव्हाण - ज्यांनी ASC च्या स्थापनेची स्फूर्ती दिली त्यांच्या स्मरणार्थ MIDA चे "यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास संस्था" असे नामकरण करण्यात आले. स्थापना महाराष्ट्र हे मोठे नागरीकरण झालेले तसेच औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. त्यामुळे उच्चपदस्थ शासकीय अधिका-यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईत प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाची स्थापना, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर, १९६३ मध्ये झाली. वीस वर्षानंतर ही संस्था पुणे येथे राजभवनच्या विस्तृत आवारात आली. त्यावेळी ती Maharashtra Institute of Development Administration (MIDA) या नावाने ओळखली जात होती. संस्थेचे रुपांतर १९९० च्या आसपास प्रबोधिनीत (अकॅडमी) होऊन संस्थेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. आता ही संस्था यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या नावाने ओळखली जाते. संस्थेच्या इंग्रजी नावावरून संस्थेला संक्षिप्तपणे यशदा असे संबोधण्यात येते. राज्यामध्ये विकास प्रशासनामध्ये या प्रबोधिनीचे स्वतंत्र असे स्थान आहे. उद्दिष्टे • लोकप्रशासक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे व्यवस्थापक, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व अन्य कर्मचारी आणि अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांना विकास प्रशासनाचे दृष्टीने प्रशिक्षण देणे. • लोकाभिमुख आणि व्यवहार्य संशोधन, संक्रियात्मक अन्वेषण करणे. • विकसन आणि लोकप्रशासन यांना सल्ला व सेवा पुरवणे. • प्रशासनाशी संबंधित सर्वोच्च संस्था म्हणून विकास प्रशासनाकरिता माहिती मिळवणे आणि तिचा प्रसार करणे. • विकास प्रशासन या क्षेत्रात शिखर राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करणे. ध्येय "राज्यातील जनतेचे समतोल व शाश्वत विकास साधणा- या लोकाभिमुख सुप्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत उत्तेजना देणे व सक्षम बनवणे हे संस्थेचे ध्येय आहे. प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांना उपयोजित संशोधनावर आधारित अनुभवसिद्ध ज्ञान, सुयोग्य तंत्रज्ञान व आवश्यक कौशल्य, कल्पक प्रशिक्षणाद्वारे देण्यास ही संस्था वचनबद्ध आहे." विकास प्रशासनामध्ये सहभागी असणारे प्रशासक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे व्यवस्थापक, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संघटना यांचे अधिकारी आणि अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यावर यशदाचा भर असतो. संशोधन आणि सल्ला याद्वारे प्रशिक्षणाची पद्धती नियमितपणे अद्ययावत करण्यात येते. यामुळे यशदाचे प्रशिक्षण घेणा- या अधिका- यांना मोठा फायदा होतो.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट