झुंज दुष्काळाशी
'झुंज दुष्काळlशी ' प्रशिक्षण आणि कृति कार्यक्रम मस्त होता खुप कही शिकायला मिळाले
- मातीचे महत्व, पाण्याचे महत्व, भूजल पातळी, पाणलोट क्षेत्र विकास, शेताची बांध बंदीस्ती , जैविक शेती, पिक नियोजन या सर्व गोष्टी प्रथमच चांगल्या प्रकारे समजुन घेता आल्या
-सलग समतल चर , अनघड दगडी बांध, माती नाला बांध , सीमेंट नाला बांध , बंधारे , शेतातळ या संकल्पनां मधला नेमका फरक व त्यातले बारकावे तसेच या सगल्यासाठी लागणारे आर्थिक व तन्त्रिक मापदंड समजले आणि प्रत्यक्ष कृतिही करायला मिळाली
-कामाचे नियोजन कसे केले जाते हे कळले
-प्रत्यक्ष शेतकर्यांशी संवाद साधता आला , मला शेतीची पार्श्वभूमी असल्याने यात विशेष काही नाही परन्तु माझ्यासोबत पुण्याकडचे काही इंजीनियरिंग , मेडिकलचे विद्द्यर्थि होते त्यातल्या काही जणांचा शेती आणि शेतकर्याशी पहिलाच संबंध येत होता त्यांच्या साठी ह अनुभव खुप महत्वाचा होता
-शेतीची पार्श्वभूमी नसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना शेती क्षेत्रात काम करतांना किती अडचणी येत असतील याची जाणीव झाली
-गावाची एकी झाल्यावर केवढा कायापलट होउ शकतो याचे जिवंत उदहरन जालन्यातल्या कडवंचि गावच्या शेती विकासतुन पहायला मिळाले , जालना दुष्काळी जिल्हा परन्तु कडवंचि गावात आजिबात पाण्याची कमतरता नाही गावची सगळी शेती नाशिकसारख्या द्राक्ष वेलींनी सजलेली .
-गावात शेतवर जाऊन काही शेतकर्यांना भेटलोत त्यांचा गावाची पाणीपातळी, विहिरीत, शेततळ्यात शिल्लक पाणी , त्याचं अगदी लीटर लीटर च नियोजन प्रत्तेक झाडांला दैनंदिन लागणार पाणी आपल्या कडील शिल्लक पाणी, पावसाला असलेला अवधि , मागच्या नऊ दहा वर्षात भारतात, महाराष्ट्रात, गावात पडलेला पाउस , या वर्षीचे तदन्यांचे अंदाज आणि त्यावरून गावाच नियोजन या सगळ्या गोष्टी आम्हाला दोन ६०-७० वयाचे वृद्ध सांगत होते. या वृद्ध शेतकर्यांचा अभ्यास आणि नियोजन माझ्यासारख्या तरुणांनाही लाजवनार होत.
- नवे आणि समविचाराचे मित्र मिळाले, दुष्काळ हा विषय चांगल्या प्रकारे समजुन घेता आला
- कडवंचिच्या विकासात मोलाचा वाटा असलेले व कृषि विज्ञान केंद्रात कृषि अभियंता असलेले वासरे सर यांची गावाबद्दलची तळमळ आणि काम करण्याची पद्धत आवडली ( त्यांनी सुट्यांच्या दिवसात आम्हाला प्रशिक्षण दिलं ) त्यानंतर प्रत्यक्ष कृति कार्यक्रम व नेट प्लानिंगसाठी आमच्यासोबत महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनचे कदम सर होते. जैविक शेती व ईतर काहि बाबतीत माझे त्यांच्याशी मतभेद होते पण ते प्रत्तेक गोष्ट समजुन सांगायचे पाणी , माती , बांध बन्धिस्तिच महत्व शेतकर्यांना तासंतास समजुन सांगायचे
एकंदरीत सगळlच अनुभव जबरदस्त होत.खरच सामाजिक क्षेत्रात काम करणारे सगळीच माणस खुप ग्रेट असतात
बाकी,
शेतकरी, आत्महत्या , बाजारपेठ , दुष्काळ , अज्ञान , पारंपरिक शेती, महागड तंत्रज्ञान , आधुनिक जीवन पद्धती आणि यात अडकलेला शेतकरी खर तर या सगळ्या दुष्ट चक्रातुन शेतकर्याला बाहेर काढण तस अशक्यच कुठल्याच तंज्ञlकड यावर जालिम उपाय नाही आहेत त्या फ़क्त मलमपट्ट्या
असं असलं तरी प्रत्तेकानं आपापल्या पद्धतीनं हालचाल करनं महत्वाचं.
(thank's
NIRMAN, MKCL, Krushividnyan kendra , Marathwada sheti sahayya mandal jalna)
टिप्पण्या