नक्षलवादी आणि आपण
नक्षलवादाच समर्थन कधीच होऊ शकत नाही , कुठलाही लोकशाहीवादी ,समतावादी ,मानवतावादी नक्षलवादाच समर्थन करू शकत नाही परंतु तरीही नक्षलवाद का निर्माण झाला ,त्यात सहभागी आदिवासी शोषित शेतकरी त्यांची परीस्थिती यावर विचारमंथन करायचं सोडून काही स्वतःला विचारवंत समजणारे नाक्षालवादाविरुद्ध लष्करी कारवाई व्हावी अशी बाळबोध मांडणी करतांना दिसत आहेत . त्या अनुषंगाने ….
मुळ प्रश्न असा आहे कि , नक्षलवाद का निर्माण झाला ? का टिकून राहिला ? व बरेचजण आजही त्याच समर्थन का करतात ? हे पाहनं महत्वाचं आहे कोणीही सहजासहजी शस्त्र उचलत नाही आपल्या प्राथमिक गरजा एखाद्या व्यवस्थेत पूर्ण होतील ,आपल्याला रोज खायला, प्यायला, अंगावर घालायला पुरेसे कपडे मिळतील ,आपल्या निवासाची सोय ती व्यवस्था करेल, त्या व्यवस्थेत आपला छळ होणार नाही ,पिळवणूक होणार नाही या अपेक्षा ठेऊनच नक्षलवादाच समर्थन व सहभाग शोषित वर्ग नोंदवत असतो भलेही त्यांच्या अपेक्षा ती व्यवस्था पूर्ण करु शकेल याची खात्री नसते . परंतु प्रचंड गरिबी ,पिळवणूक, अज्ञान यामुळे युवक लोकशाही विरोधी विचाराकडे आकर्षित होतात. नक्षलवाद्यांच्या डोक्यातली व्यवस्थ कशी असेल ,तिची भयानकता त्यामुळे निर्माण होणारी अराजकता आपण शहरात बसल्या बसल्या सांगत असतो परंतु या गोष्टी आपल्याला समजून काही उपयोग नाही या गोष्टी त्या शोषित अज्ञानी वर्गाला, आदिवासी , शेतकरी ,दलित इत्यादींना समजायला हव्यात आपल्या व्यवस्थेन त्यांच्या पर्यंत प्रभावीपणे पोहचायला हवं तुमचा विकास आमची हि व्यवस्थाच (लोकशाही) करू शकते . तुमचे मुलभूत हक्क तुमचा अन्न, वस्त्र, निवार्याचा प्रश्न लोकशाहीच सोडू शकते आणि तुमचे शोषण पिळवणूक थांबवून तुमच्यावरील अन्याय थांबून तुम्हालाही इतर जगासोबत ताठ मानेन जगण्याची हमी लोकशाहीच देऊ शकते हे आपल्या व्यवस्थेने त्यांना पटून देने गरजेचे आहे .
शोषित घटकांची ,शेतकऱ्यांची , दलितांची प्रचंड आर्थिक कोंडी आपल्या या व्यवस्थेत होत असते . अशा परिस्थितीत त्यांच्या प्रगतीचे, सुटकेचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर त्यांनी काय करावे? आजही आदिवासी गावांमध्ये वीज नाही , रस्ते नाहीत थोड्याश्या पावसाने गावांचा संपर्क तुटतो , शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही , दलाल मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करतात त्यांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत मग अश्या स्थितीत त्यांनी नक्षलवादाच समर्थन वा सहभाग घेतला तर नवल; ते कुठले !
कुठलीही चळवळ जनाधार असल्या शिवाय टिकाव धरू शकत नाही आपला विस्तार करू शकत नाही म्हणजेच त्यांचे मनसुबे पूर्ण करू शकत नाही आजच्या परिस्थितीत मराठवाडा व विदर्भात असलेला दुष्काळ व त्याला सरकार ज्या पद्धतीने हाताळण्यात अपयशी ठरले आहे ते पाहता शेतकरी आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या मुलांची आधुनिक चंगळवादी समाजाशी जुळवून घेतांना प्रचंड घुसमट होते त्यांच्यात व्यवस्थे बद्धल मोठ्या प्रमाणात चीड व संताप आहे आपला बाप , आपला नातेवाईक , आपला सगासोयरा , आपला शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून जग सोडून निघून गेल्याचा. मग अशी पिढी जर नक्षलवादी विचाराने प्रभावित झाली तर त्याला जिम्मेदार कोण ? हेच आपले शासन आपली व्यवस्था व आपणच अप्रत्यक्षरीत्या त्या परिस्थितीस जबाबदार असू हे सर्व पाहता स्पष्ट आहे कि शोषित जनतेला जागृत करा , सुशिक्षित करा , त्याचं शोषण थांबवा , पिळवणूक थांबवा दालीता वरचे अत्याचार थांबवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या , युवाकांना उच्चशिक्षण मोफत द्या, रोजगार द्या . परंतु या गोष्टी शासन करू शकत नाही (करत नाही). आपला (व्यवस्थेचा ) नाकर्तेपणा झाकण्यासाठी लष्करी कारवाई करून आवाज दाबण्याचा विचार मांडणे चुकीचे आहे वरील प्रयत्न केल्यास नक्षली चळवळीचा जनाधार कमी होईल व त्यांना नष्ट व्हायला वेळ लागणार नाही . मग त्यांच्यावर लष्करी कारवाई करायची कि नाही असं ज्ञान पाजळायची गरजही स्वयंघोषित विचारवंतांना पडणार नाही .
आपण जर खरे मानवतावादी असू तर आपण माणसं मारण्याची भाषा कधीच करू शकत नाहीत शोषितांचे प्रश्न सोडवायचे सोडून त्यांनाच संपवणे हे कधीच उत्तर होऊ शकत नाही .
"शेवटी माणूस महत्वाचा, त्याचे मानवाधिकार महत्वाचे आणि त्याच्या मुलभूत गरजा पूर्ण होणे महत्वाचे "
शोषित समाजघटकांना आपले विचार पटवून देऊन त्यांना आपलसं करण्यची , मानसा-माणसात प्रेम ,जिव्हाळा ,विश्वास ,शांतता ,निर्भयता निर्माण करण्याची व शोषणमुक्त समाज निर्माण करण्याची प्रचंड शक्ती आपल्या लोकशाही व्यवस्थेत आहे आणि आपणही त्याच शक्तीचा वापर करायला हवा न कि शस्त्रांचा .
आपल्या मद्धे आणि जहालमतवाद्यां मद्धे फरक असेल तो हाच .
आपल्या मद्धे आणि जहालमतवाद्यां मद्धे फरक असेल तो हाच .
टिप्पण्या